रस्त्या वरिल खड्डे न बुजविल्यास अजित म्हात्रे करणार आंदोलन.

रस्त्या वरिल खड्डे न बुजविल्यास अजित म्हात्रे करणार आंदोलन.

रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार गुन्हा दाखल करण्याची मागणी.

उरण दि 22(विट्ठल ममताबादे)
जासई ते न्हावा शेवा या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून सदर रस्ता प्रवास करण्यास अयोग्य झाला आहे. सदर रस्त्यावर वाहन चालविने धोक्याचे झाले आहे. त्यामुळे जासई ते न्हावा शेवा दरम्यान रस्त्यावरिल खड्डे त्वरित बुजवावेत व हे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांनी भाऊसाहेब अंधारे तहसीलदार उरण, सी बी बांगर अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे.

जासई ते न्हावा रसत्याचे निकृष्ठ काम करणाऱ्या थेकेदाराचे डिपॉजिट जप्त करावे व रस्ता त्वरित दुरुस्त करावा. अन्यथा रस्त्यावरिल खड्यात झोपुन आंदोलन करणार असल्याचे अजित म्हात्रे यांनी सांगितले. यासाठी 2 दिवसाची मुदत अजित म्हात्रे यांनी प्रशासनाला दिलि आहे. यावर कोणतेही प्रतिक्रिया न मिळाल्यास ठेकेदार व संबंधित शासकीय अधिकारी वर्गांवर सरळ गुन्हे नोंदवु असा इशारा अजित म्हात्रे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *