ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला लागली आग..

ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला लागली आग…

पनवेल, दि.23 (वार्ताहर): तालुक्यातील देवद येथे ग्रामपंचायत कार्यालयाला आज पहाटे अचानकपणे आग लागल्याने आगीत मोठ्या प्रमाणात शासकीय दस्तावेज व इतर कागदपत्रे तसेच सामानसुमानाचे जळून नुकसान झाले आहे.
          आज पहाटे चार, साडे चारच्या सुमारास अचानकपणेग्रामपंचायत कार्यालयालाआग लागली. आगीची माहिती मिळताच परिसरातील आग विझविण्यासाठी धाव घेतली. तसेच स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाला याबाबत पाचारण करण्यात आले. या आगीतमोठ्या प्रमाणात शासकीय दस्तावेज व इतर कागदपत्रे असे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.         

Leave a Reply

Your email address will not be published.