मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन तर्फे चैतन्य महोत्सवाचे आयोजन..
मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन तर्फे चैतन्य महोत्सवाचे आयोजन..
पनवेल, दि.23 (वार्ताहर): मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन तर्फे प्रथमच गुजरात राज्यातील नवसारी जवळील दांडी येथे सलग तीन दिवसाचे जागतिक पातळीवर दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान चैतन्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या चैतन्य महोत्सवात ध्यान, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम, आध्यात्मिक प्रश्नोत्तरे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तसेच हा कार्यक्रम निशुल्क असुन त्यात सर्वांना ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येईल. श्री शिवकृपानन्द स्वामी ह्यांनी हिमालयात अनेक गुरूंच्या सहवासात आपल्या आयुष्याची 16 वर्षे आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी समर्पित केली . सर्वसामान्य माणसांला हिमालयात जाऊन साधना करणे कठीण होते तसेच तेथील योगीजनांना सर्वसामान्य जगात येऊन ध्यान शिकवणे कठीण आहे. म्हणूनच हिमालयातील प्राप्त ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाला व्हावा या उद्देशाने श्री शिवकृपानन्द स्वामी गेली 20 वर्ष भारत व भारताबाहेरील 65 देशात व्याख्यान, प्रवचन, ध्यानद्वारा हे ज्ञान पोहोचविण्याचे महानकार्य करीत आहेत. श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन तर्फे दि, 7 नोव्हेंबर 2020 ते 9 नोव्हेंबर 2020 दरम्यान सलग तीन दिवस चैतन्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात सहभागी होण्यासाठी https://shivkrupanandfoundation.org/ या लिंकवर नोंदणी करावी किंवा 9869235911, 9869308910, 7304867846 या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्कासाठी किंवा नाव नोंदणीसाठी 25 ऑक्टोबर 2020 ही अखरेची मुदत आहे. सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा.