शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या. …

शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या.

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेची प्रशासनाकडे मागणी.

उरण दि 22(विट्ठल ममताबादे)आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था ही सामाजिक संघटना असून विविध उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविले जातात. अडि अडचणीत सापड़लेल्या गोर गरीबांना संस्थे मार्फत मदतीचा हात दिला जातो. अतिवृष्टि मुळे झालेल्या पावसामुळे उरण पनवेल तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.परतीच्या पावसामुळे पनवेल- उरण तालुक्यातील बऱ्याचश्या शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष रुपेशजी धुमाळ, उपाध्यक्ष भारतजी भोपी, पनवेल तालुका अध्यक्ष विवेकजी भोपी,उरण तालुका अध्यक्ष विशालजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा- जिल्हाधिकारी अलिबाग, मा-तहसीलदार पनवेल, मा- तहसीलदार उरण, मा -प्रांत अधिकारी पनवेल यांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *