कामोठे वसाहतीमधील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर…

कामोठे वसाहतीमधील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर
पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्‍वास ठेवून जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व  उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी, शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्या उपस्थितीत कामोठे शहरामधील नवीन पदाधिकार्‍यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये कामोठे वसाहत उपशाखा प्रमुख संदीप शेवाळे ( से.34 ,प्र. क्र.13),  संतोष कचरे ( से.34 ,प्र.क्र.13), पांडुरंग आचरे.( से.35 ,प्र. क्र.13),  शिवाजी माटेकर ( से.35 ,प्र. क्र.13),  प्रवीण टावरे (प्रभाग क्र.11), नितिन भोसले (से.2 ,प्र. क्र.11), चन्द्रशेखर बनसोडे ( से.11,प्र. क्र.12.), गोरेश नारकर ( से.09,प्र, क्र.11), सुनील पाटील ( से.10,प्र. क्र.12.), राजेश कावळे (से.21 ,प्र. क्र.11.)  उपविभाग प्रमुख संदीप सुतार( प्र. क्र.13),  शाखाप्रमुख गणेश गोरे (से.19 ,प्र. क्र.12) आदींना   जिल्हाप्रमुख शिरिष घरत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र  सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *