युवा सेनेच्या दणक्यानंतर तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अवैधरित्या काम करणार्या कारखान्यावर प्रदुषण मंडळाची कारवाई.
युवा सेनेच्या दणक्यानंतर तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अवैधरित्या काम करणार्या कारखान्यावर प्रदुषण मंडळाची कारवाई..
पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः युवा सेनेच्या दणक्यानंतर युवा सेनाप्रमुख व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालून तातडीने अवैधरित्या काम करणार्या कारखान्याबाबत प्रदुषण महामंडळाने माहिती घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रदुषण मंडळाने संबंधित कारखान्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी युवासेना राष्ट्रीय सह सचिव रुपेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी यांनी तळोजा येथील पडघे येथे असलेल्या एका अवैध केमिकल विघटन प्लांट चा भांडाफोड करून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
या संदर्भात त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पूर्ण माहिती देवून सदर प्रकरण लावून धरले. ह्या प्रकारात तळोजा येथील कोणत्या कंपन्या ह्या अनधिकृत कामात मदत करतात ह्या बाबत सखोल चौकशी लावण्याची मागणी रुपेश पाटील यांनी पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्री कार्यालयला केली. ह्या मागणीची सखोल चौकशी होऊन एमआयडीसी व प्रदूषण मंडळ बेलापूर यांच्या मार्फत सदर प्रकरणाची कारवाई झाली. पर्यावरण व प्रदूषण ह्या बाबत तळोजा परिसरातील रोजच्या रोज लोकांना त्रास होत असतानाच अशा बेकायदेशीर विघटन प्लांट चालवून प्रदूषणात वाढ करणार्या कंपनीवर तातडीने प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई होऊन कैरव केमिकल कंपनी व 8-9 बेकायदेशीर काम करणार्या कंपन्यांवर ’बंदी’ ची कारवाई झाली. ह्या कंपनीवर ’कारखाना बंदी’ लावल्यामुळे सर्वसामान्य जनतेने प्रदूषण मंडळाचे आभार मानले आहेत. ह्यावेळी युवासेना सह सचिव रुपेश पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेलापूर, पनवेल ह्या सर्व अधिकारी यांचे आभार मानले असून ही कारवाही इथेच ना थांबविता तळोजा एमआयडीसी असेल व इतर औदयोगिक क्षेत्रांत सुद्धा चालू ठेवून अशा कंपनीच्या मुजोरीवर नियंत्रण ठेवावे अशी विनंती केली आहे आणि पर्यावरण बाबत दुरकृत्य करून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंशी संलग्न असलेल्या विभागाचे नाव खराब करीत असेल तर आम्ही स्वतः प्रदूषण मंडळासोबत काम करून ही अनधिकृत साखळी तोडावी असे आवाहन सुद्धा केले आहे, तातडीने कंपन्यांच्या बाबत ह्या कारवाई बाबत बोलतांना शिवसेना रायगड जिल्हा जेष्ठ सल्लागार बबनदादा पाटील यांनी स्पष्ट केले की पर्यावरणबाबत कोणी अनधिकृत काम करून जनतेला प्रदूषणाच्या विळख्यात टाकत असेल तर अशा वेळी शिवसेना जनतेसाठी आंदोलन करेल, आणि न्याय देईल यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो ः प्रदुषण मंडळातर्फे कारखान्यावर करण्यात आलेली कारवाई