पनवेल उड्डाणपूलाखाली आढळला मृतदेह..
उड्डाणपूलाखाली आढळला मृतदेहपनवेल दि.18 (वार्ताहर)- पनवेल शहरातून जाणाऱ्या नाना धर्माधिकारी उड्डाणपूलाकाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, उंची 5 फूट रंग सावळा, चेहरा उभट, दाढी व मिशी वाढलेली, त्याचे केस काळे व सफेद असून उजव्या पायाला जुनी जखम आहे. त्याचप्रमाणे अंगात जांभळ्या रंगाचा फूल बाह्यांचा शर्ट घातलेला आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 किंवा पोलिस उपनिरीक्षक दिपक पाराध्ये यांच्याशी संपर्क साधावा.