खांदा कॉलनीतील 11 महिन्यापासून खोदून ठेवलेल्या रस्त्यासाठी सिडको कार्यालयावर परिवर्तन सामाजिक संस्थेचे अन्नत्याग आंदोलन…

खांदा कॉलनीतील 11 महिन्यापासून खोदून ठेवलेल्या रस्त्यासाठी सिडको कार्यालयावर परिवर्तन सामाजिक संस्थेचे अन्नत्याग आंदोलन

खांदा कॉलनी-
महानगरगॅस ची पाईप लाईन टाकण्यासाठी 11 महिन्यापासून महानगर गॅस ने खांदा कॉलनीतील रस्ते खोदून ठेवले आहेत एकूण 7535 मीटर लांबीचे रस्ते खोदले आहेत त्यात सेकटर 9 आणि सेकटर 7 ची लाईन टाकून झाले आहेत फक्त सोसायट्यांना कनेक्शन जोडणे बाकी आहे महानगर गॅस ने त्यासाठी सिडकोला दीड वर्षा पूर्वी दोन कोटी आठ लाख रुपये सिडकोच्या नियमाप्रमाणे भरले देखील आहेत
6 मार्च ला सिडकोचे मुख्य अभियंता तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्राद्वारे वाघमारे यांनी कळविले देखील होते
महानगर गॅस ने खोदलेले रस्ते व्यवस्थित पणे भरले नाहीत खोदलेल्या ठिकाणी अनेकदा माती व खडी टाकून सिडकोच्या ठेकेदाराने तात्पुरती डागडुजी केली परंतु पक्के स्वरूपाचे काम केलेले नाही रस्त्यावर छोटे मोठे दगड पडलेले आहेत त्यामुळे रस्त्यावर चालणे व दुचाकी चालवणे त्रासाचे व धोकादायक झाले आहे तसेच उघडी माती जाणाऱ्या वाहनांमुळे उडून रस्त्यालगतच्या घरात व किचन मध्ये येत आहे अश्या अनेक गृहणीच्या तोंडी तक्रारी आल्या आहेत अगोदरच नागरिक कोरोना संसर्गजन्य साथीच्या रोगाने प्रचंड त्रस्त आहेत सीडकोच्या बेजबाबदार पणामुळे खांदा कॉलनीतील रस्ते गेल्या अकरा महिन्यापासून खोदून ठेवून त्यात सिडकोने त्रासात भर घातली आहेत या धुळीमुळे स्वास घेयाला ही त्रास होत असल्याचे दिसून येते
परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या कडे नागरिकांनी रस्ते दुरुस्ती साठी आपली व्यथा मांडली असता गणेशोत्सवा मध्ये 110 गोण्या टाकून खांदा कॉलनीतील खड्डे वाघमारे यांनी 30 पदाधिकाऱ्यां सह बुजवले होते
अकरा महिन्यापासून नागरिक हा त्रास सहन करत आहेत त्यात पावसाळ्यात अनेक दुचाकी गाड्या स्लिप होऊन अपघातही घडले आहेत रस्ते पूर्ववत दुरुस्त होण्यास उशीर होत असल्याने सिडकोच्या रस्ते म्हणजे चांगले व उत्तम रस्ते या लौकीकास तडा जात आहे
तरी सिडकोने तातडीने खांदा कॉलनीतील नागरिकांना होणारा प्रचंड त्रास लक्षात घेऊन डांबराने रस्ते दुरुस्ती तातडीने करावी 20 तारखे पर्यंत दखल न घेतल्यास बुधवार पासून सिडको कार्यालय नवीन पनवेल येथे परिवर्तन सामाजिक संस्थे कडून बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *