कळंबोली पुलावर टायर फुटून ट्रक झाला पलटी..

पुलावर टायर फुटून ट्रक झाला पलटी
पनवेल दि.18 (वार्ताहर)- पनवेल महामार्गावरील कळंबोली पुलावर टायर फुटून एक ट्रक पलटी झाला आहे. या दुर्घटनेत ट्रकच्या आतील असलेल्या काचेच्या खिडक्यांचा माल पुलावर पसरल्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चुराडा झाला.
अल्युमिनियमच्या दरवाजाचा माल घेऊन हा ट्रक सायन-पनवेल महामार्गावरून जात होता. कळंबोली पुलावर आल्यानंतर अचानक या ट्रकचा टायर फुटला आणि चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यावेळी ट्रक पलटून पुलावर आदळला. यात ट्रकच्या काचा फुटून संपूर्ण रस्त्यावर पसरल्या. टायर फुटल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांनी महामार्गावर धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक व वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या ट्रकचा बाजूला केला. यात कुणीही जखमी झाला नसल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *