ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची मागणी…

कळंबोली-मार्बल मार्केट सर्विस रोड गाळात फसला
निकृष्ट दर्जाचे  कामामुळे रस्त्याची चाळण, ठिकाणी खड्डेच खड्डे

ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा
नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची मागणी

पनवेल प्रतिनिधी: – पनवेल सायन महामार्गालगतचा  मॅक्डोनाॅल्ड -मार्बल मार्केटमधून   तळोजा लिंक रोडला मिळणाऱ्या सर्व्हेस  रोडची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळ तर रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात असा प्रश्न पडला आहे. त्याचबरोबर चिखल झाल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत सिडकोने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच पेट्रोल भरण्याकरता येणाऱ्या रोडपालीकरांनाही गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सिडकोने सहा कोटी रुपये खर्च केला आहे. हे सर्व पैसे खड्ड्यात आणि पाण्यात गेल्याने पनवेल करांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करावी अशी मागणी पनवेल मनपाचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केली आहे .

कळंबोली बाजूने कळंबोली सर्कल ते  तळोजा लिंक रोड या दरम्यान अडिच कि.मी लांबीचा सर्व्हेस रोड तयार करण्यात आला आहे. परंतु पहिल्याच पावसात मार्बल मार्केट जवळ रोडवरील डांबर वाहून गेले होते. पावसाळ्यानंतर सिडकोने या ठिकाणी डागडुजी केली. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने. यंदाही  रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे  पडले  आहेत.पुरुषार्थ पेट्रोलपंपाजवळ दोन्ही मार्गीकांची चाळण  झाली  आहे.मार्बल मार्केटमध्ये या सर्व्हेस  रोडची अवस्था फार चांगली  नाही.कामोठे  सिग्नलजवळही  खड्डे  पडले आहेत.केलई  कॉलेज तसेच शिवसेना शाखेजवळ तर रस्ता  दिसत नाही.मॅक्डोनाॅल्ड हॉटेलसमोर खड्डेच खड्डे  दृष्टीक्षेपास  पडत आहेत. एकंदरीतच या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून वाहने चालवताना वाहनचालकांना घाम फुटत आहे. दोन ते अडीच फूट खड्डे असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. रोडपाली तील बहुतांशी वाहने इंधन भरण्याकरता पुरुषार्थ पेट्रोल पंपावर जातात. या खड्ड्यांचा त्यांनाही त्रास होत आहे. 

चौकट

मार्बल ग्रॅनाईट व लादयांचे ही मोठे नुकसान

रोडपाली येथील मार्बल मार्केट  पनवेल नवी मुंबई परिसरात सर्वात मोठे मार्केट समजले जाते. याठिकाणी हजारो वाहने माल भरणे आणि उतरण्या करता येतात. कित्येकदा खड्ड्यामुळे मार्बल ग्रॅनाईट तसेच लादयांचे  नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

नगरसेवक राजेंद्र शर्मा आक्रमक
गेल्या दोन वर्षापासून पुरुषार्थ पेट्रोल पंपा जवळील रस्ता खड्ड्यात जातो. सिडकोने यासाठी सहा कोटी रुपये खर्च केला. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केले आहे. परिणामी रस्ता शिल्लक राहिलेला नाही. असे असताना संबंधित ठेकेदाराला सिडकोने बील आदा कसे केले असा सवाल नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी उपस्थित केला आहे. याप्रश्‍नी शर्मा आक्रमक झाले असून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी सिडकोकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *