विधाता फाऊंडेशनच्या वतीने एमजीएम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त विधाता फाउंडेशन यांच्या वतीने महात्मा गांधी मिशन रुग्णालय कामोठे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी जिवनभाई गायकवाड विधाता फाउंडेशन अध्यक्ष, तसेच क्रार्यक्रमाचे आयोजन पत्रकार पंचशील शिरसाट विधाता फाउंडेशन सचिव, सुनील भोईर विधाता फाउंडेशन सहचिटणीस, जमिल खान विधाता फाउंडेशन उपाध्यक्ष, सुभाष गायकवाड विधाता फाउंडेशन उपाध्यक्ष, विनोद गायकवाड विधाता फाउंडेशन खजिनदार, बबन भोईर, रूपेश कांबळे, महेंद्र गायकवाड, मोबेन शेख, धिरज पाटील, शारुख खान, विक्की धनवडे तसेच अनेक रक्तडोनर्स त्यानी याप्रसंगी रक्तदान केले. त्यावेळी राज्य सरकार यांच्या आदेशा प्रमाणे पालन करून गर्दी न करता प्रत्येक रक्तदात्याने आपल्यात अतंर ठेवून महाभयानक कोरोनाच्या संकटाला दुर ठेवून छान उपक्रम राबवला रुग्णालयाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. रक्ताचा अपुरा पुरवठा असल्याची माहिती पत्रकार शिरसाठ यांना एमजीएम च्या पदाधिकार्‍यांनी दिली ह्या समस्येबाबत संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *