भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल आणि लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र चे संबंधित पदाधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न….

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल आणि लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र चे संबंधित पदाधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या पनवेल येथील कार्यालयात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल आणि लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र चे संबंधित पदाधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.
या बैठकीस लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे, राष्ट्रीय अध्यक्ष., डॉ.राजेश साखरे अध्यक्ष कोअर कमिटी, सौ. संजीवनी शिर्के, उपाध्यक्ष कोअर कमिटी, संजय कदम राज्य सरचिटणीस, सचिन कांबळे, सरचिटणीस कोअर कमिटी, सुभाष कनवाळू राज्य प्रमुख अनुसूचित जाती जमाती विभाग, मनोहर कांबळे उपाध्यक्ष कोकण विभाग, तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल, सुनिल वाघपंजे, तालुका अध्यक्ष भा.बौ.म. पनवेल, राहूल गायकवाड, तालुका सचिव, सुरेश गायकवाड, संघटक पनवेल, भैयालाल साकेत,तालुका संस्कार सचिव पनवेल, रविंद्र कलोते संरक्षण उपाध्यक्ष पनवेल उपस्थित होते. वरील संयुक्त बैठक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांचे अध्यक्षते खाली पार पडली.  सदर बैठकीस उपस्थित मान्यवरांचा परिचय तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीच्या सुरूवातीस भारतीय बौद्ध महासभेचे निवेदन मा.डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी स्वीकारून बैठकीत ठेवण्यात आलेल्या विषयांची माहिती विषद केली. भारतीय बौद्धमहासभेच्या वतीने श्री सुनिल वाघपंजे यांनी सविस्तर मनोगत व्यक्त करून भारतीय बौद्ध महासभेच्या कामकाजाची माहिती दिली. मा.डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांनी जातीचा दाखला, एपीएल, बीपिल, रेशन कार्ड, मोफत अन्नधान्य योजना, भूमिहीन शेतमजूर जमिन वाटप, तरूण पदवीधरांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन तसेच व्यवसाय मार्गदर्शन,महिला सबलीकरण व स्वावलंबन, भारतीय बौद्ध महासभा यांचे स्वतंत्र कार्यालय तसेच ग्रंथालय इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. सदरचे सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याबाबत लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र सकारात्मक प्रतिसाद देईल असे आश्‍वासन दिले. तसेच बौद्ध समाज आणि इतर समाज घटकांचे जे समान प्रश्‍न आहेत जे महिलांचे प्रश्‍न आहेत त्याबाबत सर्व मिळून सनदशीर मार्गाने शांततेत आंदोलन करू असे सौ.संजीवनी शिर्के उपाध्यक्ष कोअर कमिटी यांनी आपले मत मांडले. तसेच भारतीय बौद्ध महासभेने बौध्दांच्या प्रश्‍नांबाबत देशव्यापी आंदोलन उभारावे असे मत सचिन कांबळे सरचिटणीस कोअर कमिटी यांनी बोलताना सांगितले. बैठकीतील सर्व विषय चर्चेत सुभाष कनवाळू, मनोहर कांबळे, राहूल गायकवाड, भैयालाल साकेत, संजय कदम, डॉ.राजेश साखरे, रविंद्र कलोते ,सुरेश गायकवाड यांनी भाग घेतला. भारतीय बौद्ध सहासभेचे तालुका अध्यक्ष सुनिल वाघपंजे यांनी बैठकीतील विषयांबाबत समाधान व्यक्त केले. आभार प्रदर्शन मनोहर कांबळे यांनी व्यक्त केले.
फोटो ः भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ.संजय सोनावणे यांना त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देताना पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *