बैल कापून त्याची विक्री करणाऱ्या चौकडीपैकी एकाला रिक्षासह अटक…

बैल कापून त्याची विक्री करणाऱ्या चौकडीपैकी एकाला रिक्षासह अटक

पनवेल दि.11 (वार्ताहर)- बेकायदेशीररित्या दोन बैल कापून त्यांच्या मासांची विक्री करणाऱ्या चौघांपैकी एकाला पनवेल शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने रिक्षासह पकडले असून इतर तिघांचा पनवेल शहर पोलिस शोध घेत आहेत.           पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या बैल कापून त्यांच्या मासांची विक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारे प्राणी संरक्षण कार्यकर्ता फिर्यादी विजय निलकंठ रंगारे यांना पनवेल हद्दीत बेकायदेशिर कत्तलखाना चालविला जात असल्याची माहीती मिळाली. ती माहिती त्यांनी पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना दिली. त्यानुसार माळी यांनी याबाबतची माहिती परिमंडळ 2चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार सपोनि राहुल सोनवणे, सपोनि राजेंद्र जाधव, बीट मार्शल व इतर कर्मचारी यांच्या साथीने कच्छी मोहल्ला, पनवेल येथील नाल्याच्या बाजुला असलेल्या एका पडक्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला असता पोलीसांची चाहुल लागल्याने तेथुन तीन इसम अंधाराचा फायदा घेवुन नाल्यातुन पळुन गेले. सदर घटनास्थळी दोन बैल कापलेल्या स्थितीत मिळुन आले म्हणुन पळुन जाणारे लोंकाचा सदर भागात शोध घेत असताना एक बंदर रोडने आदील टाॅवरकडे एक संशयीत रिक्षा जात होती. तिचा पाठलाग केला असता त्यातील तीन इसम पुन्हा रिक्षातुन उडया टाकुन पळुन गेले. पोलीस पथकाने रिक्षाचालक शफीक शकील कुरेशी यास रिक्षासह ताब्यात घेतले, पळुन जाणारे इसम अदनान इमरान अन्सारी, इमरान अन्सारी, फैजान अन्सारी सर्व रा.कच्छी मोहल्ला झोपडपट्टी,पनवेल हे असल्याची खात्री झाल्याने भा.द.वी.कलम 379, 429, 268, 269,270,34 सह महा.पशू संवर्धन अधिनियम 1995 चे कलम 5 (अ), (ब), 9 (अ) सह प्राणी क्रुरता अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ) प्रमाणे त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असुन फरार आरोपींचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *