भाजपा बेस्ट कामगार संघाची बेस्टचे महाव्यवस्थापक श्री सुरेन्द्र कुमार बागडे साहेब यांच्याबरोबर करारा संदर्भात बोलणी..

भाजपा बेस्ट कामगार संघाची बेस्टचे महाव्यवस्थापक श्री सुरेन्द्र कुमार बागडे साहेब यांच्याबरोबर करारा संदर्भात बोलणी
बुधवार दिनांक ७/१०/२०२० रोजी कुलाबा येथे माननीय श्री सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासोबत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली. यामध्ये हे खालील प्रश्नावर चर्चा झाली.
१) बेस्ट कामगारांचे मागील सोळा महिन्यापासून ड्युटी शेड्युल जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर चालू करावे .यासाठी चर्चा झाली व लवकरात लवकर तोडगा काढून ड्युटी शेड्युल चार माही सुरू करण्याचे आश्वासन दिले.
२) लाॅकडावून काळातील कामगारावर गैरहजेरी बाबत जी कारवाई करण्यात आली ती मागे घ्यावी व कामगारांना कोणतेही आरोप पत्र देऊ नये अशी मागणी केली.
३) जाहीर केलेला कोवीड भत्ता रू ३००/- देण्यात यावा.
४) सन २०१६ ते २०२१ च्या कराराची बोलणी लवकर सुरू करावी अशी मागणी केली . व त्यास माननीय महाव्यवस्थापक यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. व पुढील आठवड्यापासून करारावर सविस्तर चर्चा होणार आहे.
५) बेस्ट उपक्रमाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेत लवकरात लवकर विलीनीकरण करावे अशीही मागणी करण्यात आली व यावर चर्चाही झाली.
तसेच बेस्ट कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न व कामगारांची प्रमोशन पॉलिसी यावरही चर्चा झाली . दोन्ही बाजूनी चांगल्या वातावरणात बैठक पार पडली. या बैठकीस महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री मदने साहेब श्री सांगळे साहेब व शेट्टी साहेब तसेच भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष माननीय गणेश हाके साहेब कार्याध्यक्ष प्रकाश वाळके, सरचिटणीस गजानन नागे, उपाध्यक्ष आनंदा जरग बबन बारगजे चिटणीस राजकुमार घार्गे, राजू लिहिणार, प्रशांत कदम व व भाजपा बेस्ट कामगार संघाचे अन्य पदाधिकारी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *