5 लाख 62 हजार किंमतीचे दागिने चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजा आड..

5 लाख 62 हजारकिंमतीचे दागिने चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजा आड पनवेल दि.06 (संजय कदम)- पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील शिरढोणपाडा या गावातील राहणा – या सौ.भारती भरत चौधरी यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटुन ५,६२,००० / -रुपये किमतीचे १४० ५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्याची घरफोडी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलीसांनी गजाआड केले आहे.       सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग , पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव , पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा पोलीस आयुक्त , रविद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सुचना दिल्या होत्या . गुन्हयाची उकल : वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शत्रुध्न माळी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोउपनि सुनिल तारमळे व कर्मचारी पोहवा विजय आयरे , पोशि विवेक पारासुर , पोशि सुनिल गर्दनमारे व पोशि यादवराव घुले यांचे विशेष पथक नेमले होते . सदर घरफोडीचे कार्यपध्दतीचा बारकाईने अभ्यास करता असे लक्षात आले की , सदर घरफोडी चोरीचे आरोपीत हे याच परीसरातील असावेत त्या अनुशंगाने तपास सुरू केला . सदर पथकाने गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहीती प्राप्त करून सदरच्या भागात आरोपीतवर पाळत ठेवुन एका आरोपीस पळस्पे फाटा , पनवेल येथुन ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाबाबत कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने त्याचे नाव अनिल लक्ष्मण नाईक , वय ३५ वर्ष रा.गिरवले गाव , ता.पनवेल , जि.रायगड असे सांगुन त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार राजेश नारायण वाजेकर , वय ३८ वर्ष , रा.शिरढोणपाडा , ता.पनवेल , जि.रायगड याचे मदतीने केला असल्याचे सांगितले . आरोपी नामे राजेश नारायण वाजेकर यास शिरढोणपाडा येथुन शिताफीने ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीत यांना अटक केली आहे . सदर आरोपीतांकडुन गुन्हयातील ५,१४,००० / – रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत . सदर गुन्हयाचा तपास पोउपनि सुनिल तारमळे हे करीत आहेत . सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि निलेश राजपुत , पोलीस उप निरीक्षक सुनिल तारमळे , पोहवा विजय आयरे , पोशि विवेक पारासुर , पोशि सुनिल गर्दनमारे , पोशि यादवराव घुले , पोना अमरदिप वाघमारे , पोहवा नितीन वाघमारे , पोना नंदकुमार माने , पोना पंकज पवार पोना गणेश चौधरी , पोशि म्हाळु आव्हाड व पोशि राजु खेडकर या पथकाने केली आहे.          फोटोः गुन्ह्यातील आरोपींसह पोलिस पथक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *