जगातील सर्वात मोठा कृषिप्रधान देश व जवळपास ७०% टक्के शेतीवर अवलंबून असलेला आपला भारत देश.

जगातील सर्वात मोठा कृषिप्रधान देश व जवळपास ७०% टक्के शेतीवर अवलंबून असलेला आपला भारत देश.
देशातील कृषिवल सुखी व्हावा व होणारे आत्महत्या कमी व्हाव्यात व एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी म्हणून आपल्या देशाचे कार्यक्षम व संवेदनशील पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तीन कृषी सुधारणा कायदे देशात लागू केले. शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात आला.

चांगल्या विधेयकाला विरोध करून राजकारण करण्याची नीती काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांकडून देशात अवलंबविली जात आहे.
त्याचाच एक प्रकार महाराष्ट्र सरकारातील महाविकास आघाडीने या विधेयक राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला.
त्याचा निषेध करण्यासाठी खारघर तळोजा मंडलातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सेक्टर १४ येथे बिलाला विरोध व राज्यात कायदा लागू न करण्याच्या निर्णयाविरुद्ध असलेल्या बातम्यांच्या प्रति जाळून निषेध व्यक्त केला गेला.

याप्रसंगी खारघर-तळोजा मंडलाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल,किसान मोर्च्यांचे अध्यक्ष संतोष रेवणे,नगरसेवक निलेश बाविस्कर, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे,उपाध्यक्ष दिलीप जाधव,उत्तर भारतीय सेल चे संयोजक विनोद ठाकूर,अनुसूचित मोर्च्यांचे अध्यक्ष अनिल साबणे,वाहतूक सेल चे सह संयोजक रामकुमार चौधरी,नमो नमो चे प्रदेश उपाध्यक्ष संतोषकुमार शर्मा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *