तालुका मनसेमध्ये धुसफूस ; थेट तक्रार राज ठाकरेंच्या दालनात.

तालुका मनसेमध्ये धुसफूस ; थेट तक्रार राज ठाकरेंच्या दालनात
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व असताना पक्षांतर्गत कुरघोडी मुळे संघटना वाढीसाठी अडचणी येत आहेत. तालुका सचिव असताना दुसर्‍याची नेमणूक करून पक्षात आलबेल नसल्याचे उघड झाले आहे. कट्टर मनसैनिक असलेले अगोदरचे तालुका सचिव प्रथमेश प्रभाकर सोमण यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार नोंदवली आहे. ते याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
पनवेल तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक विषय हाती घेऊन आंदोलन केले. पक्षाला राजकीय यश मिळाले नसले तरी प्रत्येक शहरात मनसेचे दखलपात्र ताकत आहे. कार्यकर्त्यांची चांगली फळी त्यांच्याकडे आहे. आजही एकनिष्ठेने अनेक जण काम करीत आहेत. त्यापैकी प्रथमेश प्रभाकर सोमण हे नाव होय. सुरुवातीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करणार्‍या सोमण यांनी पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी गुन्हे सुद्धा अंगावर घेतले पक्षाचे तालुका सचिव म्हणून ते काम करीत होते. परंतु त्यांच्या जागेवर दुसर्‍या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. जिल्हा आणि तालुका पातळीवर आपल्याला डावलले जात असल्याची तक्रार त्यांनी महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. तालुका सचिव नेमताना आपल्याला याबाबत विश्‍वासात घेतले गेले नाही. तसेच पुसटशी कल्पनासुद्धा देण्यात आले नाही समाज माध्यमांवर ही बातमी कळाली असल्याचे सोमण यांनी म्हटले आहे. इतर पक्षातून मनसेत अनेक जण येऊ इच्छितात परंतु अंतर्गत राजकारण छोटा याबरोबरच गट तट या कारणाने कार्यकर्ते पक्षात येत नाहीत. असे मत राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी व्यक्त केले आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन चार वर्षे झाली तरी त्या पातळीवर पदांची रचना करण्यात आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपण याबाबत योग्य ती कार्यवाही करून निर्णय घ्यावा अशी विनंती प्रथमेश सोमण यांनी पक्ष अध्यक्षांना केळी आहे. मी तालुका सचिव असताना त्या पदावर दुसर्‍या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. असे असले तरी आपण यापुढेही मनसैनिक म्हणून काम करू असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *