कर्तृत्ववान, जिज्ञासू, एकनिष्ठ समाजसेवक, शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा. कादीरभाई कच्छी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

कर्तृत्ववान, जिज्ञासू, एकनिष्ठ समाजसेवक, शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा. कादीरभाई कच्छी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
पनवेल वार्ता प्रतिनिधी : शुभांगी पवार

 कर्तृत्वाचा व यशाचा हिमालय सर केल्यानंतरही जे नम्रतेने  समुद्रतळाप्रमाणे आहेत, असे नायक शेतकरी कामगार पक्षाचे डॅशिंग नेते मा. कादीरभाई कच्छी अध्यक्ष - पनवेल विधानसभा मतदार संघ शे.का.प. यांना शतशः प्रणाम..
 मा. कादीरभाई कच्छी यांनी समाजकारण व राजकारण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन, आपल्या जिद्दीने व कष्टाने समाजात आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. येत्या 3 ऑक्टोबर 2020 रोजी अशा या निर्भीड, निःपक्ष आणि सडेतोड  व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त पनवेल वार्ता वेब न्युज चॅनेल परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...   

मा. कादीरभाई कच्छी यांनी आजवर खूप कौतुकास्पद कार्य केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर महामारीचे संकट असताना सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या प्रतिबंधक उपाय योजना राबवित संकटात असणाऱ्या व्यक्तींना, गरजूंना मदतीचा हात दिला आहे. ते सतत समाजसेवा करण्यासाठी सातत्याने झटत असतात.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात येताच त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले, गरीब गरजूंवर मायेचा हात फिरवला. जिथे कमी तिथे “कादीरभाई कच्छी ” नावाची हमी हे ब्रिद मनाशी बाळगून त्यांनी जनमानसात आपला वेगळा ठसा उमटवला.. अश्या कर्तृत्ववान, जिज्ञासू, एकनिष्ठ समाजसेवक यांना आपले कार्य असेच समाजातील गरजूंना उपयोगी ठरेल, त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामूळे हास्य निर्माण व्हावे. कूणालाही एकटेपणा वाटणार नाही, जीवणात नैराश्य येणार नाही असे कार्य हातून घडावे ह्याच मनःपूर्वक शुभेच्छा..

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *