प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम..

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम

गांधी व शास्ञी जयंतीनिमित्त कोविड योद्धा सन्मान पञ वाटप

हाथरस येथील पिडीत भगिनीला वाहिली श्रद्धांजली

देवणी,लातूर
दि.2 आॅक्टोबर रोजी म.गांधी व लालबहाद्दुर शास्ञी यांचे जयंतीचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,देवणीच्या वतीने ग्रामीण महिला विकास संस्था देवणी येथे कोविड योद्धांना सन्मान पञ वाटप करण्यात आले
यावेळी कार्यक्रामाचे अध्यक्ष ग्रामीण महिला विकास संस्थेचे चेअरमन कुशावर्ता ताई बेळ्ळे यांच्या हस्ते कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक जबाबदारी म्हणून पञकार, आशा कार्यकर्ती गटपर्वतक , सामाजिक कार्यकर्ते ,यांनी कोरोना योद्धा म्हणून आपली भुमिका बजावली त्यामुळे प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शना नुसार देवणी तालुका प्रेस संपादक व पञकार सेवा संघाच्या वतीने कोविड योद्धा सन्मान पञ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करणेत आले.
यावेळी कुशावर्ता ताई बेळ्ळे, पञकार बालाजी टाळीकोटे, शकिल मनियार, कृष्णा पिंजरे, नरसींग सुर्यवंशी, दिलीप शिंदे, शोभा बिरादार, सुरेखा सुर्यवंशी, वत्सला सुर्यवंशी, शिंराजाराम पाटील, कचराबाई ईसाळे, भगवान इसाळे, धनाजी कांंबळे , सुखवास इसाळे, प्रकाश कांंबळे , रेखा लांडगे, आनिल मिटकरी, पांडुरंग कदम, सुनिता सुर्यवंशी, आबासाहेब भद्रे, लखन कसले, आदीना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
तत्पुर्वी म. गांधी व लालबहाद्दुर शास्ञी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व शेवटी निंदणीय घटनेतील उत्तर प्रदेशातील हाथरस, बलरामपुर व तेलंगानातील मोईनाबाद बलात्कार हत्या कांडातील अत्याचार पिडीत महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
या कार्यक्रमाचे सुञसंचलन व प्रास्ताविक प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे तर आभार सत्यशिला सरवदे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुर्यवंशी नागनाथ, प्रेरणा जाधव, विकास बिरादार, सुनिता सुर्यवंशी आदीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *