उद्योजक श्रीकांत नायक यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

🔹उद्योजक श्रीकांत नायक यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड🔹
कल्याण(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कल्याण जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या शुभ हस्ते नुकतेच संपन्न झाले.
सदर प्रसंगी सामाजिक क्षेत्रात व उद्योग क्षेत्रात यशस्वी पणे काम करणारे
श्रीकांत नायक यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी निवड जाहीर केली व त्यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आले.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दररोज महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य अनुभवी नेते कार्यकर्ते/महिला/ युवक/ युवती/ व्यवसायिक /कलाक्षेत्रातील कलावंत/ उद्योजक /विद्यार्थी/ पक्षात दाखल होत आहे.
श्रीकांत नायक यांचा जनसंपर्क संपूर्ण महाराष्ट्रात असून सर्वच घटकांतील त्यांचे संबंध चांगले असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी निश्‍चितपणे फायदाच होईल, श्रीकांत नायक यांच्या निवडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
👉🏻श्रीकांत नायक लॉक डाऊन संपल्यानंतर राज्यव्यापी कार्यकर्ता भव्य संमेलन/ सभा देखील आयोजित करणार असल्याचेही त्यांनी त्यांच्या निवडीनंतर घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *