रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी उभी…

महाविकास आघाडी पनवेल-उरणचे अध्यक्ष बबनदादा पाटील
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील रसायनी पट्ट्यात असणार्‍या एचओसी कंपनीच्या जागेत बीपीसीएल कंपनीचा नवा प्रोजेक्ट उभा राहत आहे. जोपर्यंत या भागातील प्रकल्पग्रस्तांना व शेतकरी बांधवांना न्याय मिळत नाही व त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी या शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम उभी असून शासनाकउे पाठपुरावा करून कोणत्याही परिस्थितीत येथील बांधवांना न्याय मिळवून देणारच असा निर्धार महाविकास आघाडी पनवेल-उरणचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी आज या समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करताना केला.
यावेळी पनवेल येथे या समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हस्कर, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिटणीस काशिनाथ कांबळे, नारायण लक्ष्मण पाटील आदींनी महाविकास आघाडीचे पनवेल-उरणचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील हे सुद्धा उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत या परिसरातील प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडणार नाही. त्यांना न्याय मिळवून देणारच यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना.एकनाथ शिंदे आदींच्याकडे हा विषय मांडला असून संबंधितांना याबाबत माहिती देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देवू व काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन करू, काम बंद पाडू असा इशारा सुद्धा महाविकास आघाडी पनवेल-उरणचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी आजच्या बैठकीत दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *