सरकार ews मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा असा अध्यादेश काढ़त होते म्हणून संभाजी राजे यांनच्या माध्यमातून अर्जन्ट मीटिंग घेण्यात घेतली

काल छत्रपती संभाजी राजे नी अशोक चव्हाण व् मुख्यमंत्री यांच्या सोबत अर्जन्ट मिटींग घेतली त्या मध्ये 20/25 समन्वयक उपस्थित होते. अर्जन्ट मिटींग घेतली कारण सरकार ews मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा असा अध्यादेश काढ़त होते म्हणून संभाजी राजेनी अर्जन्ट मीटिंग घेतली त्यामध्ये अशोक चव्हाण याना सर्वानी समजावून सांगितले की जर मराठा समाज ews मध्ये आला तर सुप्रीम कोर्टात अडचण निर्माण होईल आणि ews च्या कायद्या नुसार ज्या समाजाला आरक्षण आहे त्याना या कायद्यात समाविष्ट करता येत नाही तरी सुद्धा सरकार घाई घाईत हा निर्णय घेतोय ते चुकीच आहे. ते अशोक चव्हाण याना पटल त्या नंतर मुख्यमंत्र्यांना अशोक चव्हाण छत्रपति संभाजी राजे आणि नरेंद्र पाटील भेटले त्यानी मुख्यमंत्र्यांना सर्व गोष्टी सांगितल्या त्यावर त्यानी सहमती दाखवून हा अध्यादेश काढणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले . बाकीच्या पण आपल्या मागण्या सांगितल्या जो पर्यंत मराठा आरक्षण वरील स्थगिती उठत नाही तो पर्यंत पोलिस भरती सह कुठलीही भरती होता कामा नये तसेच पुढील महिन्यात mpsc ची परीक्षा होणार आहे ती पुढे ढकलावी . 2019 च्या mpsc उत्तीर्ण अधिकाऱ्यांना तत्काल नियुक्ति देण्यात यावी . 2014 च्या 3500 हजार मराठ्याना नोकरीत सामावून घेणे. आणि सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर मराठा आरक्षण वरील स्थिगिति उठवावी. जो पर्यंत नोकर भरती रद्द होत नाही व् आरक्षण वरील स्थगिती उठत नाही तो पर्यन्त आंदोलन चालूच राहतील असे शेवटी सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *