लहान मुलाचे शोषण करणार्‍या गुन्हेगाराला तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात .

लहान बालकाचे शोषण करणारा अटकेत
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः लहान मुलाचे शोषण करणार्‍या एकाला तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील पडघे गावातील एका लहान मुलाच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर तळोजा पोलीस ठाण्याचे पो.नि.राजू अडागळे व त्यांच्या पथकाने सदर 22 वर्षीय युवकाला परिसरातून शोध घेवून ताब्यात घेतले आहे व त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदर युवक हा कंत्राटी कामगार असून लहान मुलाला वेदना झाल्यानंतर हा प्रकार त्याच्या कुटुंबियांना लक्षात आला. त्यानुसार त्या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *