समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक ़यांच्याकडून लाँकडाऊनमध्ये पेंदरमधील १५० आदिवासीना एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम 

कळंबोली / प्रतिनिधी 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर टाळेबंदीत सामाजिक बांधिलकी जपत समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक यांच्याकडून  पेदर आदिवासी वाड्यातील १५० लोकांना एकवेळचे जेवणाचे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असा प्रकारे ते आज दहा दिवस जेवण देत आहेत . आणीबाणीत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून त्यांच्यावर आशिर्वादाचा वर्षाव होत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी करण्यात आली आहे.  राज्यात दिवसागणिक कोरोनाचे पेशंट वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाची महामारी संसर्ग असल्याने नागरिकांचा संपर्क येवू नये म्हणून राज्य सरकारकडून काही विभाग सील करण्यात  आले आहेत. या लाँकडाऊन काळात सर्व व्यवसाय बंद आहेत. हातावर पोट भरणाराना काम नसल्याने आर्थिक गणित कोलमडले घरातील अन्नधान्य  संपल्याने आदिवासी बांधवां समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण  झाला आहे. त्यांना एकवेळचे जेवण मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.  यांचे हाल होत आहेत. यावेळी अनिल नाईक यांनी मदतीचा हात देत लाँकडाऊन काळात एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे ते रोज एकवेळचे जेवण देत आहेत. धान्याचे वाटप करण्याचा निर्णय त्यानी मागे घेतला. धान्याचे वाटप केल्यास पुन्हा ते बनविण्यासाठी अन्य वस्तूंची आवश्कता लागणार आहे तेव्हा ते दररोज जेवण तयार करून देत आहे याचा लाभ १५० आदिवासी बांधव घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *