भिम आर्मी पालघर जिल्हाच्या वतीने विनोदी अभिनेत्री भारती सिंग हिच्यावर गुन्हा दाखल होवून कठोर कारवाई होणे बाबत मागणी..
भिम आर्मी पालघर जिल्हाच्या वतीने विनोदी अभिनेत्री भारती सिंग हिच्यावर गुन्हा दाखल होवून कठोर कारवाई होणे बाबत मागणी..
पनवेल वार्ता पालघर प्रतिनिधी : गणेश कलिंगडा
*”खतरा-खतरा-खतरा” या कलर्स टीव्ही वरील शो मध्ये विनोदी अभिनेत्री श्रीम.भारती सिंग यांनी, संपुर्ण आदिवासी समाजाला उद्देशून ‘ ये आदिवासी लोगही एसा कच्छा (अंडरवेयर) पहनते हैं ‘ या अश्लील शब्दप्रयोगासोबत अश्लील कृती करत,जातीवाचक अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांन्वये व सायबर क्राईम अँक्ट नुसार गुन्हा दाखल होवून कठोर कारवाई होणे बाबत भिम आर्मी पालघर जिल्हाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
भिम आर्मी पालघर जिल्हाच्या वतीने विनोदी अभिनेत्री भारती सिंग हिच्यावर आदिवासी समाजा बद्दल अपमान कारक व जातीवाचक टीका केल्यामुळे ऍट्रॉसिटी व सायबर क्राईम अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मीचे कोकण प्रदेश अध्यक्ष अशोकदादा शिंगाडा यांनी पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आदिवासी विभाग यांच्याकडे केली आहे. या वेळी जिल्हासंघटक गणेश कलिंगडा, जिल्हाउपाध्यक्ष राजन सोनावणे, जिल्हा सचिव फिरदोस सुरती, मोखाडातालुका अध्यक्ष जयराम तुंबडा, तलासरी तालुका अध्यक्ष भावेश दवणेकर, तलासरी तालुका संघटक लक्ष्मण नम व कार्यकर्ते उपस्थिती होते.