पल्लवी परदेशी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

पल्लवी परदेशी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

उरण 29(विठ्ठल ममताबादे)
“डोंबिवली मिडटाउन रोटरी क्लब” पुरस्कृत संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 100 विशेष शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून ऑनलाईन सत्कार करण्यात आला आहे.ज्या ज्या शिक्षकांनी मुलांना शिकण्यासाठी आणि उत्कृष्ट व्यक्ती होण्यासाठी, जे प्रेरणादाई कार्य केले आहे. त्यांच्या योग्य समर्पणाबद्दल त्यांना मानाचा” आदर्श शिक्षक पुरस्का २०२०” देण्यात आला आहे.यामध्ये उरणच्या स्वामी ब्राह्मानंद प्रतिष्ठान ,सिबर्ड विषेश शाळा, बोरी, उरण येथील मुख्य शिक्षीका सौ.पल्लवी संतोष परदेशी यांनाही सदर पुरस्कार मिळाला असल्याने विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पल्लवी परदेशी या मनमिळावू उत्तम, विद्यार्थीप्रिय, शांत संयमी असून उरण तालुक्यातील बोरी येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या सिबर्ड विशेष शाळा येथे मुख्य शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून उत्तम विद्यार्थी घडविले आहेत. उरण तालुक्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू संतोष परदेशी यांच्या त्या पत्नी आहेत.पल्लवी परदेशी यांनी घरदार सांभाळून सुद्धा आपली शिक्षकाची नोकरी, आपली जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली.त्यांच्या या कार्याची दखल घेत डोंबिवली मिडटाऊन रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *