उरण तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी अनिल ठाकूर.
उरण तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी अनिल ठाकूर.
उरण प्रतिनिधी दि 29 भारतीय काँगेसच्या अध्यक्षा मा. श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून युवक काँग्रेसचे सक्रिय सदस्य तथा उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अनिल अशोक ठाकूर यांची उरण तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी सर्वानुमते, बिनविरोध, वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात आली. तसे नियुक्ती पत्रही अनिल ठाकूर यांना देण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपणारे अनिल ठाकूर हे उच्चशिक्षित असून गाव पातळीवर युवक काँग्रेसचे त्यांनी उत्तमरीत्या काम केले.अनिल ठाकूर 15 वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. ते पालवी सामाजिक संस्था भेंडखळचे सदस्य देखील आहेत. रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर, मोफत नेत्र चिकित्सा, वृक्षारोपण, कोरोना महामारी मध्ये अन्न धान्य वाटप,मास्क व सॅनिटायझरचे वाटप असे अनेक उपक्रम अनिल ठाकूर यांनी वेळोवेळी राबविले. अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष मा. बी श्रीनिवासन, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, इटंकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रजी घरत, रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, गणेश म्हात्रे, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, तालुकाध्यक्ष जे डी जोशी, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय पाटील तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अनिल ठाकूर हे उरण तालुक्यातील युवक काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती उरण तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.