पत्रकार नितीन फडकर यांच्या काकाचे निधन

पत्रकार नितीन फडकर यांच्या काकाचे निधन

पनवेल(प्रतिनिधी)मल्हार टीव्हीचे संपादक नितीन फडकर (कोळी) यांचे काका सतीश फडकर यांचे शुक्रवारी (दि.२५) वयाच्या ५४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन भाऊ, एक बहीण, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सतीश फडकर हे वाशी येथील एमएसईबी महामंडळात सीनीयर अ‍ॅपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने फडकर परिवारावर शोककळा पसरली आहे. सतीश यांचा होमविधी मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी, दशक्रिया विधी श्री क्षेत्र नाशिक येथे रविवार दिनांक ४ ऑक्टोबरला तर उत्तरकार्य ०६ ओक्टोंबर रोजी वाशी येथील राहत्या घरी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *