लॉकडाऊनच्या काळातील रिक्षा व कॅबसाठी लागणारा पोलिस ना हरकत मुदत बाह्य दाखला तोच ठेवण्याची शिवसेनेची मागणीपनवेल

लॉकडाऊनच्या काळातील रिक्षा व कॅबसाठी लागणारा पोलिस ना हरकत मुदत बाह्य दाखला तोच ठेवण्याची शिवसेनेची मागणीपनवेल

पनवेल, दि.25 (वार्ताहर)- लॉकडाऊनच्या काळातील रिक्षा व कॅबसाठी लागणारा पोलिस ना हरकत मुदत बाह्य दाखला तोच ठेवण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख विश्वास पेटकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेलचे अनिल पाटील यांच्याकडे केली आहे.        यावेळी विभागप्रमुख विश्वास पेटकर यांनी सांगितले आहे की, लॉकडाऊनच्या काळात पनवेल परिवहन कार्यालयसुद्धा बंद होते त्यामुळे ज्या बेरोजगार तरूणांनी रिक्षा व कॅबसाठी पोलिस ना हरकत दाखला काढला होता तो सदर कार्यालय बंद असल्यामुळे त्या बेरोजगारांकडे तसाच पडून होता. परंतु आत्ता परिवहन कार्यालय सुरू झाले असून बेरोजगारांना रिक्षा व कॅबसाठी लागणारे पोलिस ना हरकत दाखला पुन्हा काढण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे सदर तरूणांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरकार राज्य सरकार वाहनधारकांसाठी पासिंग टॅक्सच्या सुविधा देत असून आपणसुद्धा पोलिस ना हरकत दाखला लॉकडाऊनच्या काळात चालवून घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सदर मागणीची त्यांनी प्रत खा. श्रीरंग बारणे, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीक्ष घरत, महानगरप्रमुश रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दिपक निकम यांना पाठवली आहे.            फोटोः विश्वास पेटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *