सूर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य रायगड संस्थापक/अध्यक्ष मा.सुमित दादा नवलकार यांचा वाढदिवस खाऊ वाटप करून साजरा..

सूर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य रायगड संस्थापक/अध्यक्ष मा.सुमित दादा नवलकार यांचा वाढदिवस खाऊ वाटप करून साजरा..

पनवेल वार्ता प्रतिनिधी : शुभांगी पवार.
पनवेल : जगभर कोरोनाने थैमान घातले आहे, त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता त्यांना एक हात मदतीचा म्हणून सूर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य रायगड संस्थापक/अध्यक्ष मा.सुमित दादा नवलकार यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात न करता, गोर – गरिबांना खाऊ वाटप करून घाटकोपर याठिकाणी साजरा केला. लहान मुले, पोलीस बांधव यांना खाऊचे पॅकेट देऊन वाढदिवस सार्थकी लागला असल्याचे चित्र पहावयास मिळाले. लहान मुलांना आवडीचा खाऊ मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर हसू होते, या उपक्रमामुळे एक आगळे समाधान मिळाले असल्याची भावना सूर्या ग्रुप महाराष्ट्र राज्य रायगड संस्थापक/अध्यक्ष मा सुमित दादा नवलकार यांनी व्यक्त केली. यावेळी खाऊचे वाटप करताना रायगड चे जिल्हा अध्यक्ष उमेश दादा शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन भाऊ महाबले, जिल्हा कार्याध्यक्ष जयेश भाऊ कोकरे, जिल्हा शहराध्यक्ष राजूभाऊ केंडे, युवक आघाडी अध्यक्ष अक्षय भाऊ आखाडे, ग्रामीण अध्यक्ष किरण भाऊ शिंदे, शहराध्यक्ष संदीप भाऊ महाबले, प्रवीण झोरे, अंकुश यमकर आदी सर्व मास्क घालून उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *