गोरगरिब लाभार्थींना रेशन दुकानातील धान्य मिळत नसल्याने संबंधितांवर कारवाई कऱण्याची शिवसेनेची मागणी.

गोरगरिब लाभार्थींना रेशन दुकानातील धान्य मिळत नसल्याने संबंधितांवर कारवाई कऱण्याची शिवसेनेची मागणी.

पनवेल दि. 20 (वार्ताहर)- सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात गोरगरिब लाभार्थींना मोफत धान्यवाटप करण्याचे धोरण शासनाने आखून दिले असतानाही तालुक्यातील अनेक रेशन दुकानात अशा प्रकारचे धान्य वाटप केले जात नाही तरी अशा रेशन दुकानांची सखोल चौकशी करून संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ओवे विभागप्रमुख गणेश चरपट म्हात्रे यांनी पनवलचे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
             या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या प्रादूर्भावामुळेलॉकडाऊनच्या काळात गोरगरिब व गरजूंना सरकारकडून तसेच इतर माध्यमातून अन्नधान्याचे वाटप केले जाते. सरकारी योजनेतून पिवळे रेशनकार्ड तसेच केशरी रेशनकार्ड धारकांना मिळणारे पूर्ण रेशन ज्या पद्धतीने सरकारकडून पुरविला जातो. त्या पद्धतीने रेशनकार्ड धारकांना व लाभार्थींना त्याचे वाटप केले जात नाही. तरीअशा रेशन दुकानांची सखोल चौकशी करून संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ओवे विभागप्रमुख गणेश चरपट म्हात्रे यांनी पनवलचे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *