कामगाराच्या न्याय हक्कासाठी राज साहेबाची कामगार सेना महाराष्ट्र राज्य वखारमहामंडळ द्रोणागिरीत धडकली.

कामगाराच्या न्याय हक्कासाठी राज साहेबाची कामगार सेना महाराष्ट्र राज्य वखारमहामंडळ द्रोणागिरीत धडकली.

मनसेमुळे मिळणार कामगारांना न्याय.

उरण दि 16(विठ्ठल ममताबादे)
कोरोनाच्या काळात जेएनपीटी परिसरातील गोडाऊन मधील सर्व्हे , लोकल लेबर , गार्ड यांना कामावरून काढणे , पगार कपात करून कामगारांनवर अन्याय होत असताना .महाराष्ट्र वखारमहामंडलातील कामगारांनी न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद स्विकारले असून त्याच्या वर झालेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस सचिन गोळे , सावंत , जिल्हाध्यक्ष अतुल भगत , यतीन देशमुख ,उपतालुकाध्यक्ष सत्यवान भगत , अमोल बोचरे , दिपक पाटील आणि कामगार प्रतिनिधी यांनी वखार महामंडळाचे अध्यक्ष ,कृष्णां लॉजिस्टिक चे इनचार्ज यांना धारेवर घेऊन येत्या दहा दिवसांत कामगाराच्या मागण्या आणि चार महिन्याचे पगार दिला नसून तो त्वरित देण्यात यावा अन्यथा कामगारांच्या जिवाशी खेळत असाल तर मात्र मनसे च्या पद्धतीने समजावे लागेल असे व्यवस्थापनाला ठणकवण्यात आले .उरण मध्ये कामगार वर्गांच्या अनेक समस्या आहेत. मनसेमुळे ते समस्या आता सुटण्यास मदत होईल. कामगारांना न्याय मनसेचं मिळवून देईल असा आत्मविश्वास कामगार वर्गांमध्ये निर्माण होत असून टप्य्या टप्प्याने अनेक कामगार वर्ग मनसेचे सदस्यत्व स्वीकारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *