मोदींच्या वाढदिवशी महाविकासआघाडीच्या वतीने ‘बेरोजगार’ दिवस, केक कापून केला निषेध…

मोदींच्या वाढदिवशी महाविकासआघाडीच्या वतीने ‘बेरोजगार’ दिवस, केक कापून केला निषेध…


पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज गुरुवारी (17 सप्टेंबर) 70 वा वाढदिवस साजरा झाला.. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, पनवेल महाविकासआघाडीच्या वतीने आज निषेध म्हणुन केक कापून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला.
देशातील युवक बेरोजगार आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. देशातील युवा नोकरी मागत आहे, पण सरकारने या तरुणांच्या हातात कटोरा दिलाय.अशीच काहीतरी परिस्थिती झाल्याचे पनवेल महाविकासआघाडीच्या वतीने सांगण्यात आले. मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करून देत आज अनेकांनी #राष्ट्रीय बेरोजगारी दिवस हा हॅशटॅग वापरून मोदी सरकाराला प्रश्न विचारले आहेत.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणिस मा.गणेश दादा कडु ,युवक काॅग्रेस्स चे जिल्हाध्यक्ष मा.हेमराज दादा म्हात्रे ,पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मा.पूरोशोत्तम दादा भोईर ,युवा नेते .अवधुत पाठारी ,युवा नेते .अजय बेनके ,युवा नेते .सुनिल वानखेडे ,युवा नेते .रीतेश ठक्कर हे उपस्थित होते !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *