कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा पुढाकार

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा पुढाकार

उरण दि 15 प्रतिनिधी
रसायनी एम.आय.डी.सी., चावणे विभागातील ह्युडाई मोटर कंपनीचे मोबीस इंडिया स्पेअर पार्ट्सच्या गोडावूनमध्ये गेल्या सहा वर्षापासुन १२२ कामगार काम करित आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी १२२ कामगारांपैकी फक्त 54 कामगार कंपनीत काम करतील अशी कंपनीच्या गेटवर नोटिस लावल्याने सर्व कामगार एकत्र येवुन जोपर्यंत १२२ कामगारांना कामावर घेत नाही तो पर्यंत कंपनी चालु न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कामगारांवर होणा-या अन्यायाला न्याय देण्यासाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व आमदार महेंद्र थोरवे यांनी मा.उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांची मंत्रालय येथे तातडीने भेट घेवुन या कामगारांना न्याय देण्याबाबत विनंती केली असता.

याबाबत मा.उद्योग मंत्री यांनी ताबडतोब आज मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी संबंधीत विभागाचे अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली.

सदर बैठकीमध्ये ह्युडाई मोबीज इंडिया या कंपनीने सर्व कामगार कामावर घेण्यात यावे तसेच कोणत्याही कामगाराची नोकरी जाऊ नये अशा सूचना कंपनी व्यवस्थापनाला केल्या आहेत.
तसेच कंपनी व्यवस्थापनाला पुढील २ दिवसात निर्णय घेण्याचा अवधी दिलेला आहे.

सदर बैठकीसाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, आमदार महेंद्र थोरवे, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, कामगार उपायुक्त पवार साहेब, युनियन प्रतिनिधी रोहित विचारे, कंपनी व्यवस्थापन डेपो हेड काम सर, एच आर विशाल साळुंखे व महेश सोनवणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *