“मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना” तात्काळ लागू करणेबाबत हेमलता रवि गोवारी यांची मागणी…
“मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना” तात्काळ लागू करणेबाबत हेमलता रवि गोवारी यांची मागणी…
पनवेल : माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशाची सेवा आणि विविध स्तरातून प्राप्त झालेली मागणी विचारात घेता सर्व माजी सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या दृष्टिकोनातून नागरी स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन नगर विकास निर्णय दिनांक
०९/०९/२०२० नुसार “मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या वीर पत्नीला मालमत्ता कर माफी योजना” या योजनेअंतर्गत नागरी स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तींना तात्काळ लाभ द्यावा ही विनंती हेमलता रवि गोवारी यांनी निवेदनाद्वारे पनवेल महानगरपालिका आयुक्त मा. सुधाकर देशमुख यांना केली आहे .