एलीगंट टच’ सलून चे श्री विक्रांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

एलीगंट टच’ सलून चे श्री विक्रांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…

नवीन पनवेल येथील ‘एलीगंट टच’ या सलून चे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे मा उपमहापौर श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.हा नवीन व्यावसायिक उपक्रम श्री नईम चिकटे यांचा असून त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे.ग्राहकांना चांगली सेवा दिल्याने श्री नईम चिकटे यांचा एलीगंट टच सलून हा ब्रँड खूप लवकर नावारूपाला आला आहे. याप्रसंगी श्री विक्रांत पाटील यांनी त्यांना पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थितीत युवकांशी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री विक्रांत पाटील म्हणाले की, कोरोना संकट काळात नोकऱ्यांची समस्या उद्भवत असल्याने युवा मित्रांनी काळानुरूप बदलून असेच छोटे व्यवसाय सुरू करण्याविषयी पुढाकार घेतला पाहिजे, तेंव्हाच आपल्याला स्वतः आत्मनिर्भर होता येईल आणि देशाच्या आत्मनिर्भरते मध्ये भरीव योगदान देता येईल.या प्रसंगी नगरसेवक श्री समीर ठाकुर,नगरसेविका सौ राजश्री वावेकर , प्रशांत पाटील,उदय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *