ट्रेकिंग पडली असती महागात जर ह्यांचे लक्ष नसते….
आज रोजी नेरे चौकी येथे कर्तव्यावर असताना रुपेश पाटील राहणार नेरे यांना फोन आला की तीन व्यक्ती या पेबगड येथे ट्रेकिंग करता गेले असता तेथे जंगलामध्ये त्यांना कोणताही खाली उतरण्याचा रस्ता दिसून येत नाही तरी त्यांना मदत करा असा फोन आल्याने त्यांनी तात्काळ नेरे पोलीस चौकी येथे येऊन माहिती दिली आम्ही एपीआय पगार पोलीस हवालदार अवतार पोलीस शिपाई तुषार पाटील असे तात्काळ रुपेश पाटील यांच्यासोबत जाऊन तेथील संतोष या आदिवासी मुलाची मदत घेऊन भरपावसात त्या तीन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप परत खाली आणले त्या तीन इसमांची नावे १) ओमकार शिरीष शेट्टी 24 वर्ष राहणार मुंबई २) जयेश संजय मेहता वय 23 वर्ष राहणार मुंबई ३) पुनीत रामदास बेहलानी 23 वर्ष राहणार मुंबई करिता माहितीस्तव सविनय सादर