उरण माहिती अधिकार मार्गदर्शन शिबीर संपन्न.

उरण माहिती अधिकार मार्गदर्शन शिबीर संपन्न.

माहिती अधिकार बाबत उरण मध्ये जनजागृती.

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )
रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उरण तालुका मध्ये माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघ ची उरण तालुकास्तरीय सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

दिनांक 12/09/2020 रोजी संत निरकारी भवन हनुमान कोळीवाडा उरण ता.उरण जिल्हा.रायगड येथे उरण तालुका कार्यकारणी सभा भरविण्यात आली.सदर सभेच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप उपस्थित होते.यावेळी सभेचे उद्देश व चर्चा –सामाजिक शासकीय कामकाज, माहीती अधिकार कायदा, भ्रष्टाचार निर्मूलन, कायद्याचे उद्देश महत्वपूर्ण बाबी माहीती या शब्दाचा अर्थ, माहितीसाठी अर्ज पध्दत, प्रथम अपील,द्वितीय अपिल, माहिती आयोगाचे पत्ते, संघटनेचे लेटर हेड बनविणे व वापरणे याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सभासदांना, कार्यकर्त्यांना माहीती अधिकार पुस्तके व नमुना अर्जाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शर्मिला कोळी (उरण तालुका संपर्क प्रमुख ), सदानंद कोळी(उरण तालुका मुख्य संघटक ), प्रदीप पाटील, नरेश कोळी, दिप्ती पाटील, शिवाजी ठाकूर, अजय कोळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *