पनवेलच्या भाजपच्या 54 नगरसेवकांचे दोन महिन्याचे मानधन महापौर निधीला
पनवेल ( नितिन देशमुख ) : पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या 54 नगरसेवकांनी आपले दोन महिन्याचे मानधन महापौर निधीसाठी जमा करण्याचा निर्णय घेताला असून तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकुर यांनी महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे .
कोरोंना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जाहीर केल्यावर शासनस्तरावर आर्थिक मंदीची परिस्थिति येऊ लागली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका उपाय योजना राबवित आहे . त्याचा परिणाम महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने महापालिकेला आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यामुळे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी कोरोंनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन नगरसेवक, उद्योजक आणि नागरिकांना केले आहे .
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक जण आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. पनवेल महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या 54 नगरसेवकांनी आपले दोन महिन्याचे मानधन महापौर निधीसाठी देत असल्याचे जाहीर करून तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकुर, नगरसेवक नितिन पाटील आणि अनिल भगत यांनी महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांना दिले.