प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने ए.पी.आय. विजय चव्हाण कोरोना योध्दाने सन्मानित..

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने ए.पी.आय. विजय चव्हाण कोरोना योध्दाने सन्मानित

यवतमाळ : बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ए.पी.आय. श्री. विजय चव्हाण हे लाॅकडाऊन काळात जिवाची पर्वा न करता परिसरातील नागरिक कोरोना या विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रात्र दिवस एक करून अतिशय मेहनत घेतल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने बिटरगाव पोली स्टेशनचे ए.पी.आय.श्री. विजय चव्हाण यांना कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष गजानन गंजेवाड, तालुकाध्यक्ष उदय पुंडे, तालुका सरचिटणीस मोहन कळमकर, कमलाकर दुलेवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *