नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आढळला मृतदेह..

नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आढळला मृतदेह
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः नवीन पनवेल ब्रीज सिग्नल समोरील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 70 ते 75 वर्षे, उंची 5 फूट 3 इंच, डोक्याचे केस काळे पांढरे, मिशी व दाढीचे केस काळे पांढरे वाढलेले, अंगात निळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व राखाडी रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस हवालदार सुहास माळी यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *