रोजगार प्रश्नांवर महाराष्ट्र युवक काँग्रेस आक्रमक.

रोजगार प्रश्नांवर महाराष्ट्र युवक काँग्रेस आक्रमक.

उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिले निवेदन.

उरण प्रतिनिधी दि.१०
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. तहसिलदार ता.उरण जि.रायगड यांना वाढत्या बेरोजगारी व वर्षांची २ कोटी नवे रोजगार या गंभीर प्रश्नांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.सध्याच्या कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे अनेक लोकांचे रोजगार गेले. व बेरोजगारीचे भिषण संकट सद्यस्थितीत उभे राहिले आहे. या सर्व बाबीं गांभीर्याने घेऊन व युवकांचे भविष्य लक्षात घेऊन तात्काळ रोजगार निर्मिती करावी व युवकांना न्याय द्यावा.अशीं मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे चिटणीस निखिल नरेंद्र डवळे, उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत , रायगड जिल्हा सरचिटणीस जितेश म्हात्रे, उरण विधानसभा सरचिटणीस विवेक म्हात्रे,उरण शहर अध्यक्ष अब्दूल शिलोत्री,चिटनीस आदित्य घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *