आदेशाचे पालन न करणार्यांवर महापालिकेनी केली दंडात्मक कारवाई..
आदेशाचे पालन न करणार्यांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई
: पनवेल महानगरपालिकेच्या चार प्रभागांतील अतिक्रमण पथकांनी कोरोना विषाणु / कोविड -19 चे नियमांचे पालन न करता मास्क न वापरणारे नागरिक व दुकानदार यांच्या बेजाबाबदारपणामुळे स्वताच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली असता एकुण दंडात्मक रक्कम रु. 1,39,600/- वसूल करण्यात आली आहे.
सदरची कारवाई महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार उप आयुक्त विठ्ठल डाके, प्रभाग कार्यालयाचे प्रशासन प्रमुख, अ व ब प्रभागाचे सहा.आयुक्त समिर जाधव आणि क व ड प्रभागाचे सहा.आयुक्त वंदना गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने केली. या पथकात अ प्रभागाचे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी, यांचे निर्देशानुसार खारघर विभाग व तळोजे विभाग येथे केलेल्या धडक कारवाई मध्ये एकुण रक्कम रु. 61,100/- इतकी वसुली करण्यात आली. ब प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रकाश गायकवाड, यांचे निर्देनुसार कळंबोली विभागातुन मास्क न वापरणारे नागरिक व दुकानदारांवर दंडात्मक 40 पावत्या फाडून रक्कम रु. 4600/- वसूल केले व संध्याकाळी 7.00 नंतर दुकाने चालु ठेवून नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानदारांवर दडं आकारुन रक्कम रु. 42,500/- वसूली असे एकुण रक्कम रु. 47,500/- दडं जमा करण्यात आले. तसेच क प्रभागाचे प्रभाग अधिकारी अरुण कोळी, व ड प्रभागाचे प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण पथकांने कामोठे, खांदेश्वर विभाग मध्ये एकुण रक्कम रुपये 20500/- दंड तर पनवेल विभागांतर्गत रक्कम रु. 10,900/- दंड वसुल करुन कोविड 19 चे नियमांचे पालन न करणार्या बेजबाबदार नागरिकांवर तसेच दुकानदारांना समज देण्यासाठी सदरची धडक कारवाई करण्यात आली आहे. जेणे करुन पुनश्य बेजबाबदारपणे वागुन स्वताच्या व इतरांच्या आरोग्याशी खेळ करणार नाहीत. अशी धडक कारवाई बेजबाबदारपणे वागणार्या नागरीक व दुकानदार यांच्यावर पुन्हा करण्यात येईल असे सुचीत करण्यात आले आहे.