विचुंबे गावातील घटना पतीने केली पत्नीची हत्या ;पनवेल परिसरात उडाली खळबळ..
पतीने केली पत्नीची हत्या ; परिसरात खळबळ
पनवेल, दि.9 (वार्ताहर) : किरकोळ भांडणातून पतीने रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याची घटना घडली असून त्यामुळे त्या इमारतीसह परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
सारथी जाधव आणि सूर्यकांत जाधव (मूळ गाव श्रीवर्धन) यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ते विचुंबे येथे राहत असत. त्यांच्यात नेहमी किरकोळ भांडणे होत असत. मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. याचा राग आल्याने सूर्यकांत जाधव याने सारथी हिचा टॉवेलने गळा आवळून खून केला. पोलिसांनी आरोपी सूर्यकांत जाधव याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत