पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी…

पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मुखेडच्या वतीने मागणी

मुखेड,नांदेड : पुणे येथील टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली असताना कुचकामी आरोग्य यंत्रणेमुळे योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला असून शासनाने अद्यापही आर्थिक मदत केलेली नसल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मुखेड तालुक्याच्या वतीने पांडुरंग रायकर यांच्या परिवारास शासनाने ५० लक्ष रूपयांची आर्थिक मदत तात्काळ द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मुखेड यांना देवून तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू म्हणजे प्रशासनाच्या कुचकामी यंत्रनेमुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाव असून ही अतिशय निंदनीय बाब आहे. रायकर मृत्यू प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार असेल तर त्याचं स्वागतच आहे मात्र पुन्हा अशी वेळ कोणत्याही पत्रकारावर येणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मुखेडच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मुखेड चे तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे, कार्याध्यक्ष असद भाई बल्खी, सचिव मोतीपाशा पाळेकर, रवी सोनकांबळे सहसचिव, कोषाध्यक्ष शेख चांदपाशा सावरगावकर, सहकोषाध्यक्ष राजू रोडगे, गणेश आडे ता.उपाध्यक्ष, रमेश राठोड सहकोषाध्यक्ष, प्रसिध्दी प्रमुख सचिन चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *