खारघर येथील मोबाईल शोरूममधुन घरफोडी करणा – या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा नवी मुंबई यांचेकडुन अटक , सुमारे ४५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत …

खारघर येथील मोबाईल शोरूममधुन घरफोडी करणा – या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा नवी मुंबई यांचेकडुन अटक , सुमारे ४५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल (वार्ताहर): मध्यरात्री शिव इलेक्ट्रॉनिक्स , खारघर , नवी मुंबई या मोबाईल शोरूमचे शटर गॅस कटरने कट करून सुमारे ५० लाख किमतीचे महागडे मोबाईल , लॅपटॉप , रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याने खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा . रजि . नंबर १७१/२०२० भादवि कलम ३८०,४५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . नवी मुंबईचे नवनिर्वार्चित पोलीस आयुक्त श्री . विपीनकुमार सिंग सो व पोलीस सह आयुक्त , डॉ . जय जाधव , पोलीस उप आयुक्त , प्रविणकुमार पाटील , सुरेश मेंगडे , सहायक पोलीस आयुक्त , विनोद चव्हाण यांनी गुन्हा उघडकीस आणणे व तपासाबाबत मार्गदर्शन केले . गुन्हेगारांनी सदरचा गुन्हा अतिशय धाडसाने नियोजनरीत्या व त्यांची ओळख पटु नये म्हणुन शोरूममधील डी . दि.आर. काढुन मोबाईलचे शोरूम फोडुन लाखो रूपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला होता . सदर गुन्हयाचा समांतर तपास चालु असताना मध्यवर्ती कक्ष , गुन्हेशाखेचे वरिष्ठ पालीस निरीक्षक एन . बी . कोल्हटकर यांना नमुद गुन्हयातील आरोपींबाबत खात्रीशीर मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवुन धारावी , मुंबई येथुन आरोपी नामे १ ) शफिकउल्ला उर्फ सोनु अतिकउल्ला वय २४ वर्षे , रा . रूम नं . ५४/२/२ , जीआरडीई मनपा चाळ , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग , लेबर कॅम्प , माटुंबा , मुंबई मुळ राहणार निवराबाद , कोसंबी , उत्तरप्रदेश , २ ) अयान उर्फ निसार उर्फ बिटु रफी अहमद शेख , वय २८ वर्षे , रा . समता चाळ , ९ ० फिट रोड , हिमालय हॉटेलचे पाठीमागे , धारावी , मुंबई मुळ राहणार मेहसौल , सीतामढी , राज्य बिहार , व नालासोपारा येथुन ३ ) इम्रान मोहमद उर्फ इम्मु बिंदु अन्सारी वय २५ वर्षे , रा . रूम नं . ३०१ , नशिमन अपार्टमेंट , रेहमतनगर , नालासोपारा ( पुर्व ) जि . पालघर यास ताब्यात घेतले . गुन्हयाचे अनुषंगाने केलेल्या चौकशीमध्ये नमुदचा गुन्हा केला असल्याची त्यांनी कबुली दिल्याने दिनांक ०४ / ० ९ / २०२० रोजी त्यांना अटक करण्यात आलेली असुन दिनांक ११ / ० ९ / २०२० रोजीपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे . गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपींकडुन गुन्हयातील सुमारे ४५ लाख रूपये किंमतीचे मोबाईल , लॅपटॉप , डी.व्हि.आर. इत्यादी हस्तगत करण्यात आले आहे . तसेच नमुद गुन्हयात वापरण्यात आलेली टॅक्सी ही आरोपींनी दि . १४/०८/२० रोजी कुर्ला प.येथुन चोरी केलेली होती . त्याबाबत कुर्ला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असुन तोही गुन्हा उघडकीस आलेला आहे . सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन गुन्हा करण्यापुर्वी ते चार चाकी गाडी चोरी करून मोबाईल शोरूमची रेकी करतात त्यानंतर ताडपत्रीच्या आडोशाने गॅसकटरने शोरूमचे शटर कट करून शोरूममधील सीसीटिव्ही , डीव्हीआर काढुन घेतात व सर्व मोबाईल चोरी करतात , चोरी केलेले मोबाईल राजस्थान , दिल्ली , हरीयाणा अशा राज्यामध्ये मालवाहु टक डायव्हरमार्फत तेथील एजंटला अर्ध्या किंमतीमध्ये विकतात . आरोपी क . १ याचेवर ७ , आरोपी क्र .२ याचेवर २ , आरोपी क . ३ याचेवर १७ अशाप्रकारचे मुंबई , ठाणे ग्रामिण , पालघर येथे गुन्हे दाखल आहेत . कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये धारावी , मुंबई सारख्या ठिकाणाहुन धाडसाने रात्रों -दिवस अथक परिश्रम घेवुन आरोपींना अटक करून अल्पावधीत सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर , सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर , राजेश गज्जल , निलेश तांबे , सफौ . संजय पवार , पोलीस अंमलदार पोपट पावरा , विष्णु पवार , सचिन धनवटे , विजय पाटील , मिथुन भोसले , सतिश सरफरे , शशिकांत शेंडगे , दिलीप भास्करे , मेघनाथ पाटील , सतिश चव्हाण , रूपेश कोळी , उर्मिला बोराडे , अनिता पवार यांनी केली आहे . नमुद गुन्हयाचा पुढील तपास सपोनि . ज्ञानेश्वर भेदोडकर , मध्यवर्ती कक्ष , गुन्हेशाखा हे करीत आहेत . ” ” “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *