शैक्षणिक वर्ष २०१९-२० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर द्यावी – अभाविप ची मागणी.


शैक्षणिक वर्ष २०१९-२० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर द्यावी – अभाविप ची मागणी.

उरण दि 6(विठ्ठल ममताबादे)
कोरोना विषाणू ने जगभरात घातलेल्या थैमाना मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व क्षेत्रातील व्यवहार बंद झालेले आहेत.परिणामी सर्व नागरिकांचे आर्थिक उत्पन्नाची साधने बंद झाली आहेत.यामुळे विद्यार्थी-पालक हे मानसिक व आर्थिक संकटांना तोंड देत आहेत.पालक व विद्यार्थी वर्गाला भविष्याची चिंता भेडसावत आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती साठी महापालिका क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.परंतु शैक्षणिक वर्ष संपले तरी या विद्यार्थ्यांना अजून ही शिष्यवृत्ती भेटलेली नाही. शाळा व महाविद्यालया मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरू करण्यात आले आहे व या वर्षाची शैक्षणिक शुल्क शाळा महाविद्यालया मार्फत घेण्यात सुरुवात झाली आहे. तसेच नव्या ऑनलाईन शिक्षण पद्धती मुळे लागणाऱ्या साधनसामुग्री साठी वाढीव खर्च पालकांना करावा लागत आहे. कोरोना संकटाच्या या पार्श्वभूमीवर ही शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना एक आशेचा किरण देणारी ठरणार आहे. या विषया संदर्भात आज अभाविप नवी मुंबई शिष्टमंडळाच्या वतीने महापालिका आयुक्त मा.श्री.अभिजीत बांगर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी अभाविप शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा करत लवकरच सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होईल असे आश्वासन दिले.
सदर प्रसंगी अभाविप कोंकण प्रदेश सहमंत्री अमित ढोमसे ,नवी मुंबई जिल्हा संयोजक शंकर संगपाळ ,सहसंयोजक कृष्णा दुबे ,विद्यार्थिनी प्रमुख प्राची सिंग ,वाशी भाग मंत्री आशुतोष पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *