भाजयुमो प्रदेश पदाधिकारी तसेच विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष महामंत्री यांची बैठक .
संभाजी नगर येथे मराठवाडा विभागातील भाजयुमो प्रदेश पदाधिकारी तसेच विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष महामंत्री यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी काळात संघटन बांधणी , युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्प या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अंत्योदयाचे ध्येय उराशी बाळगून मिळालेल्या सेवा संधीचे सोने करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रभारी श्री. संजय जी कौडगे, भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री संजयजी केणेकर, श्री.प्रवीण जी घुगे,सरचिटणीस राहुल जी लोणीकर ,उपाध्यक्ष राजेंद्र जी साबळे,कोषाध्यक्ष अभिषेक जी जैस्वाल, व इतर मान्यवर उपस्थित होते.