प्राथमिक आरोग्य केंद्रातील अँटीजन चाचण्या पुन्हा सुरू ; शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश….

प्राथमिक आरोग्य केंद्रातील अँटीजन चाचण्या पुन्हा सुरू ; शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजन चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे काही मिनिटात कोरोना लक्षण आहेत की नाही. हे समजून येत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी ही चाचणी उपयुक्त ठरत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून याकरता लागणार्‍या किट उपलब्ध नसल्याने अ‍ॅटीजेन चाचण्या होत नव्हत्या . यासाठी शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगर पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मनपा प्रशासनाने 1000 किट उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्रांना करण्यात आलेले आहे. त्यामुळे अँटीजन चाचण्यापुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या किट कमी पडणार नाहीत याची महापालिकेने दखल घ्यावी अशी मागणीही शेवाळे यांनी केले आहे.
अ‍ॅटीजेन चाचणीसाठी रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. या रक्ताच्या नमुन्यातून 15 ते 20 मिनिटांत शरीरात कोणते विषाणू आहेत याचा तपास लागतो. लक्षणं नसलेल्या लोकांसाठी रॅपिड टेस्टिंग वरदान ठरतंय. रुग्णाच्या शरीरात अ‍ॅन्टिबॉडी कार्यरत नसेल तर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. रॅपिड अँटीजेन ही कोरोना चाचणीला पर्याय असल्याने गेल्या काही दिवसांमध्ये मनपा हद्दीतील आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या चाचण्या करून घेतल्या. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्ण डिटेक्ट होवून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. यामुळे कोरोनाविषाणू चे संक्रमण नियंत्रणात आणण्यात सुद्धा बर्‍यापैकी यश मिळाले. स्वॅब घेतल्यानंतर कोरोना अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. दरम्यान पनवेल महानगरपालिकेने सर्व आरोग्य केंद्रात अँटीजेन चाचणीस सुरूवात केले. दिवसभरात अनेकांची चाचणी केली जात होती. परिणामी यामुळे कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण डिटेक्ट होतात . दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर अँटीजेन टेस्टिंग किट उपलब्ध नाहीत. परिणामी टेस्ट करण्याचे काम थांबले आहे. यामुळे कोरोना नियंत्रण आणि संक्रमण थांबवण्याचा दृष्टिकोनातून अडचणी येऊ लागल्या. पनवेल महानगरपालिकेने त्वरित,अँटीजेन टेस्टिंग किट उपलब्ध करून नागरिकांच्या जास्तीत जास्त चाचण्या कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी केली होते. त्यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्रही दिले होते. दरम्यान नव्याने 1000 किट महापालिकेने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आहेत. त्यामुळे अँटीजेन चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात शेवाळे यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *