पनवेल उरण महाविकास आघाडी, दिवंगत माजी खासदार दि बा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीला पनवेल,उरण, नवी मुंबई मधील बहुतांश सामाजिक संघटनांचा पाठींबा…

पनवेल उरण महाविकास आघाडी,
दिवंगत माजी खासदार दि बा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीला पनवेल,उरण, नवी मुंबई मधील बहुतांश सामाजिक संघटनांचा पाठींबा

आज दिनांक ०४.०९.२०२० रोजी साय ०५.०० पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पनवेल उरण महाविकास आघाडी,दिवंगत दि ब पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकारी व सामाजिक संघटनांची संयुक्त बैठक पार पडली सदर बैठकीत पनवेल उरण,नवी मुंबई परिसरातील प्रलंबित मागण्यांसाठी अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सदर बैठकीत उपस्थित सर्व संघटनांचे मान्यवर पदाधिकारी यांनी एकमुखाने संघर्ष समितीला पाठिंबा जाहीर करून पनवेल ,उरण तसेच नवी मुंबई परिसरातील प्रलंबित प्रश्न व होऊ घालणारे प्रकल्प याबाबत सखोल चर्चा करून जनतेच्या हितात न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे लढा देऊ अशी ग्वाही दिली.
आजच्या बैठकीत सर्वानुमते संघर्ष समितीचे अध्यक्ष तसेच माननीय मुख्यमंत्री,माननीय उपमुख्यमंत्री, माननीय महसूलमंत्री, व माननीय नगरविकास मंत्री यांच्या आभाराचा ठराव पारित केला. सदर बैठकीस संघर्ष समितीच्या वतीने खालील मान्यवर उपस्थित होते
श्री बबनदादा पाटील, अध्यक्ष,संघर्ष समिती
श्री बाळाराम पाटील, आमदार, विधानपरिषद
श्री विधितज्ज्ञ सुरेश ठाकूर, ९५ गांव संघर्ष समिती
श्री प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस
श्री जे एम म्हात्रे,माजी संचालक सिडको
श्री दशरथ भगत,शेतकरी संघटनेचे नेते
श्री सुदाम पाटील कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा काँग्रेस
श्री निलेश पाटील,आगरी कोळी युथ फोरम
श्री सूरदास गोवारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
श्री अनिल नाईक,जिल्हाध्यक्ष,सपा
श्री गणेश कडू,शेकाप चिटणीस
श्री मदन गोवारी,विधितज्ज्ञ,
श्री आर डी घरत शेकाप नेते,
श्री सुधाकर पाटील, संतोष पवार ,वामन शेळके, रवींद्र भगत,रमाकांत पाटील,दीपक पाटील, गडगे वकील,प्रकाश म्हात्रे,श्री मनोहर पाटील,श्री बाळाराम फडके,श्री साईनाथ पाटील,श्री रुपेश धुमाळ,श्री जगदीश पाटील,श्री हिराशेट तांडेल,श्री निग्रेश पाटील विधितज्ज्ञ,श्री विष्णू जोशी,श्री अनिल ढवळे, श्री बबन भोईर ,श्री प्रमोद ठाकूर,श्री राजेश केणी ,श्री एकनाथ पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपला
श्री बबन पाटील
अध्यक्ष संघर्ष समिती
श्री सुदाम पाटील
सचिव संघर्ष समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *